कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करताना 247 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून सदाफ शमास आणि मुनीबा अली उतरली होती.तर टीम इंडियाकडून पहिली ओव्हर टाकायला रेणुका सिंह आली होती.
रेणूकाच्या पहिल्यावर बॉलवर मुनीबा अली खेळताना बॉल थेट विकेटमागे गेला होता. या दरम्यान बॅटीला कड लागल्या सारखा आवाज आला.हा आवाज एकूण भारतीय खेळाडूंनी अपील केले पण अपायरने खेळाडूला नाबाद दिले.त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला. पण त्यात ही बॅटला बॉलला स्पर्शच झाला नाही. त्यामुळे मुनीबा नॉट आऊट ठरली.आणि भारताने रिव्ह्यू गमावला.
advertisement
त्यानंतर त्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रेणुका सिंहने सदाफ शमासला एलबीडब्ल्यू केले. पण अंपायरने तिला नॉटआऊट दिले.त्यामुळे टीम इंडियाने पुन्हा रिव्ह्यू घेण्याची रिस्क घेतली नाही. पण नंतर ज्यावेळेस थर्ड अंपायरने दाखवले, त्यावेळेस पिचिंग इंन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेटस हिटींग यावरत तीनही सिग्लन रेड होते.त्यामुळे सदाफ शमास ही एलबीडब्ल्यू आऊट होती. पण भारताने रिव्ह्यूच न घेतल्यामुळे तिला जीवनदान मिळालं.त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये भारताने दोन मोठ्या चुका केल्या होत्या.
सहाव्या ओव्हरला कॅच ड्रॉप
सहाव्या ओव्हरलाही भारताकडून मोठी चूक घडली आहे. क्रांती गौडच्या बॉलवर सिद्रा अमीनने मारलेला बॉल पहिल्या स्लिपकडे गेला होता. पण रिचा घोष कॅच ड्रॉप केली.त्यामुळे टीम इंडियाची ही तिसरी चूक ठरली.
दरम्यान पाकिस्तानने 9 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 23 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदांजांना धावा काढण्यापासून रोखले आहे.