India W vs South Africa W FINAL : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर आज भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात महिला वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. मुंबईत पावसामुळे या सामन्यास प्रचंड उशीर झाला होता. पण आता टॉस संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.त्याचसोबत संपूर्ण 50-50 ओव्हर्सचा सामना पार पडणार आहे.त्यामुळे सामन्याचा पहिला बॉल किती वाजता फेकला जाणार आहे? याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
खरं तर साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्यात दुपारच्या 2.30 वाजता टॉस होणे अपेक्षित होते. पण पावसामुळे टॉस होऊ शकला नाही आहे.तसेच सामन्याला साधारण 3 वाजता सूरूवात होते. पण या दोन्ही डेडलाईन हुकल्या आहेत. त्यामुळे आता साधारण पावसामुळे एक दीड तासाच वेळ वाया गेला होता. पण आता टॉस संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार फायनल सामन्याचा टॉस 4.32 वाजता पार पडणार आहे.त्यानंतर सामन्याचा पहिला बॉल 5 वाजता फेकला जाणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण 50-50 ओव्हरचा खेळ होणार आहे.त्यामुळे चाहते सुखावले आहेत.
कट ऑफ टाईम जाहीर
फायनल मॅचसाठी दोन तासांचा वाढीव वेळ उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की जर सामना संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी सुरू झाला तर षटकांमध्ये कपात होण्याची शक्यता नाही. तथापि, जर ते शक्य नसेल तर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर षटकांमध्ये कपात केली जाऊ शकते.
तसेच जर पावसाचा असाच खेळ सूरू राहिला तर प्रत्येक संघाच्या 20 षटकांच्या खेळासाठी कट ऑफची वेळ रात्री 9:08 वाजेपर्यंत आहे. तसेच तितक्याही ओव्हरचा पुन्हा पाऊस पडला, तर राखीव दिवसाचा विचार केला जाईल. त्याआधी प्रथम आज मॅच खेळवण्याचा प्रयत्न होईल. परंतु कट ऑफ वेळेनुसार जरी खेळ सुरू झाले नाहीत तरी ते राखीव दिवसात जाईल.
राखीव दिवशीही पावसाचे सावट
जर रविवारी अंतिम सामना खेळवता आला नाही, तर सोमवार हा राखीव दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे. जर राखीव दिवशी सामना खेळवता आला नाही, तर दोन्ही संघांना ट्रॉफी वाटून घ्यावी लागेल आणि संयुक्त विजेता घोषित केला जाईल. रविवारप्रमाणे सोमवारीही नवी मुंबईत पावसाची शक्यता आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
