India W vs South Africa W Final : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर सूरू असलेल्या फायनल सामन्याचा टॉस साऊथ आफ्रिकेने जिंकला आहे. आफ्रिकेने आता गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भारताचा महिला संघ प्रथम फलंदाजीला उतरणार आहे.दरम्यान या फायनल सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर साऊथ आफ्रिकेच्या कर्णधाराने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला आहे.भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील सेमच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे. ज्या 11 खेळाडूंनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तेच खेळाडू आता आफ्रिकेशी भिडणार आहे.
हवामान आणि परिस्थिती पाहता आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. पण हो, हा एक महत्त्वाचा सामना आहे आणि कसा तरी असे वाटते की आम्ही पुन्हा लयीत आलो आहोत. आशा आहे की, आम्ही मुक्तपणे फलंदाजी करू शकू आणि बोर्डवर एक मजबूत धावसंख्या उभारू शकू असे हरमनप्रीत कौर टॉस दरम्यान म्हणाली आहे.
थोडा पाऊस पडत आहे, त्यामुळे नंतर पाठलाग करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे असे वाटते आणि थोडी हालचाल उपलब्ध आहे. पृष्ठभाग खूपच चांगला दिसत आहे आणि आशा आहे की गेल्या काही तासांपासून झालेल्या पावसामुळे आम्हाला सुरुवातीला थोडा स्विंग मिळेल. पण हो, एकंदरीत खूप चांगली खेळपट्टी दिसतेय. निश्चितच, आम्ही येथे यापूर्वी कधीही खेळलो नाही, पण मला वाटते की आम्ही संपूर्ण स्पर्धेत परिस्थितीशी जुळवून घेण्यात खूपच चांगले आहोत. आशा आहे की आमचे गोलंदाज परिस्थितीचे लवकर मूल्यांकन करू शकतील आणि आजचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतील,असे साऊथ आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड म्हणाली आहे.
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
