सकारात्मक बदल घडेल - हरमनप्रीत कौर
टीम इंडियाने 2005 आणि 2017 नंतर भारतीय महिला संघाने आता पुन्हा वन-डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. '2017 मध्ये आम्ही उपविजेते ठरून मायदेशात परतलो, त्यानंतर इथल्या महिला क्रिकेटमध्ये मोठे, सकारात्मक बदल झाले. महिलांचे क्रिकेटमध्ये येण्याचे प्रमाण वाढले. देशांतर्गत स्पर्धांमधील सहभागाचा आकडाही मोठा झाला आहे, असं म्हणत हरमनप्रीतने सकात्मक गोष्टीकडं लक्ष वेधलं.
advertisement
तिकीट मिळवण्याचं प्रेशर - हरमनप्रीत कौर
टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने यावेळी आपल्या तिकीट मिळवण्याचं प्रेशर देखील असल्याचं म्हटलं आहे. अनेकजण सामन्याचं तिकीट मागत आहेत. पण अशा लहान गोष्टीचं प्रेशर असलं तर ते तुम्हाला आनंद देणारं देखील असतं, असं हरमनप्रीत कौरने म्हटलं आहे.
वुमेन्स क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन
'मी तर त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे, जेव्हा आपण महिला क्रिकेटकडे अधिक गांभीर्याने बघू आणि अधिकाधिक भारतीय मुली या खेळाकडे करिअर म्हणून बघतील,' अशी अपेक्षा हरमनप्रीतने व्यक्त केली. त्यामुळे आता वुमेन्स क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे WPL मुळे हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज या खेळाडू लोकप्रिय झाल्या, हे देखील नाकारता येत नाही.
देशवासियांना कौतुक वाटत असेल
दरम्यान, सेमीफायनल मॅच आणि जेमिमाची कामगिरी संपूर्ण संघासाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यापद्धतीने गेल्या दोन सामन्यांत आम्ही कामगिरी केली आहे, त्यानंतर मला खात्री आहे, की देशवासियांनाही आमच्याबद्दल असेच कौतुक वाटत असेल,' असे हरमनप्रीतचे म्हणाली आहे.
