India W vs South Africa W Final : पावसाच्या खेळ खंडोब्यानंतर नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर सुरु झालेल्या सामन्यात टीम इंडियाने चांगली सूरूवात केली होती.कारण टीम इंडियाच्या स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा या दोन्ही सलामीवीरांनी 104 धावांची पार्टनरशीप केली होती.त्यानंतर या दोन्ही खेळाडू आपआपलं अर्धशतक पुर्ण करतील असे वाटत असताना स्मृतीची विकेट पडली आहे.त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
स्मृती मानधना सुरूवातीपासून चांगली खेळी करत होती.त्यानंतर क्लो ट्रायन गोलंदाजी आला होती.यावेळी तिने तिच्या पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर स्मृतीची विकेट घेतली होती. स्मृतीच्या बॅटीला कड लागली होती,त्यामुळे बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला होता. अशाप्रकारे स्मृती मानधना 58 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाली होती.या खेळीत तिने 8 चौकार लगावले होते.
दरम्यान स्मृती बाद झाल्यानंतर जेमीमा रॉड्रीक्स मैदानात आली आहे. त्यानकर शफाली वर्माने देखील आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. सध्या टीम इंडियाच्या 1 विकेट गमावून 143 धावा झाल्या आहे. टीम इंडिया आता पुढे जाऊन किती धावांचा डोंगर उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
