India W vs South Africa W Final : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर सूरू असलेल्या वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात भारताच्या 'लेडी सेहवाग' शेफाली वर्माने वादळी खेळी केली आहे. शेफाली वर्मा शतकाच्या उंबरठ्यावर असताना तिची विकेट पडली आहे.त्यामुळे तिचं शतक हुकलं आहे. पण जरी शेफाली वर्माचं शतक हुकलं असलं तर तरी तिने भारताची धावसंख्या एका चांगल्या स्थानी नेली आहे.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधाना आणि शेफाली वर्माने चांगली सूरूवात केली होती.दोन्ही खेळाडूंनी यावेळी 100 धावांची पार्टनरशीप केली होती. अशाप्रकारे वर्ल्ड कपमध्ये शतकीय भागिदारी करणारा ही पहिलीच जोडी ठरली होती.त्यावेळी दोन्हीही खेळाडू अर्धशतकाच्या नजीक होत्या. मात्र त्याच दरम्यान स्मृतीच्या बॅटीला कड लागली होती,त्यामुळे बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला होता. अशाप्रकारे स्मृती मानधना 58 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाली होती.या खेळीत तिने 8 चौकार लगावले होते.
दरम्यान स्मृती बाद झाल्यानंतर जेमीमा रॉड्रीक्स मैदानात आली आहे. त्यानंतर शफाली वर्माने देखील आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. त्यानंतर ती वेगाने शतकाच्या दिशेने चालली होती. मात्र त्याच दरम्यान 87 धावांवर ती आऊट झाली. या खेळीत तिने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.यानंतर शफालीच्या मागोमाग जेमीमा रॉड्रीक्स देखील 24 धावांवर बाद झाली आहे. सध्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा मैदानात आहेत.
टीम इंडिया वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
