ऑस्ट्रेलियाने अ ने भारतासमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण अभिषेक शर्मा 22 धावांवर स्वस्तात बाद झाला.त्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला पण तो देखील 3 धावांवर बाद झाला.त्याच्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रभासिमरनने भारताचा डाव सावरला होता.प्रभासिमरनने यावेळी 102 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले आहेत.
advertisement
प्रभासिमरणच्या पाठोपाठ श्रेयस अय्यरने 62 धावांची अर्धशतकीय खेळी. त्याच्यासोबत रियान परागने देखील 2 धावांची अर्धशतकीय खेळी होती.या खेळाडूंच्या बळावर भारत 280 पर्यंत पोहोचला होता. आता भारताला विजयासाठी 37 धावा हव्या होत्या. पण शेवटच्या क्षणी एकामागून एक विकेट पडत होत्या. असं वाटतं होतं भारत हा सामना गमावेल.पण त्याचवेळी विपराज निगमने 24 आणि अर्शदिप सिंहने 7 धावांची महत्वपुर्ण खेळी करून भारताला 2 विकेटने सामना जिंकून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघ आणि टॉप मर्फीने प्रत्येकी 4 विकेट काढल्या होत्या. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना 317 धावांवर ऑल आऊट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून जॅक इडवर्ड या कर्णधाराने 89 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्यासोबत लियाम स्कॉटने 73 आणि कुपर कॉनोलीने 64 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 317 धावा ठोकल्या होत्या. भारताकडून
अर्शदिप आणि हर्षित राणाने प्रत्येकी 3 विकेट काढल्या. आयुष बदोनी 2 आणि गुरजनप्रीत आणि निशांत सिंद्धुने प्रत्येकी 1 विकेट काढली.