राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी टीम इंडिया
सिनियर मेन्स सिलेक्शन कमिटीने कतारमध्ये होणाऱ्या आशिईन क्रिकेट काउंसिलच्या राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया 'ए' संघाची निवड केली आहे. ही स्पर्धा 14 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दोहा येथील वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळली जाईल. या स्पर्धेत टीम इंडिया 'ए' संघाला ग्रुप 'बी' मध्ये ओमान, यूएई आणि पाकिस्तान 'ए' या संघांसोबत स्थान मिळालं आहे.
advertisement
रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेसाठी इंडिया ए संघ :
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (VC), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (C) (WK), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजय कुमार व्यिश्क, युध्विर सिंग चरक, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा.
स्टँडबाय खेळाडू: गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद.
दरम्यान, टीम इंडिया आरसीबीचा स्टार खेळाडू जितेश शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळेल. तर प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशी या दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच नमन धीर, सूर्यांश शेडगे, रमणदीप सिंग, हर्ष दुबे आणि आशुतोष शर्मा यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजय कुमार व्यिश्क, युध्विर सिंग चरक यांच्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे.
तसेच अभिषेक पोरेल आणि सुयश शर्मा यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन, समीर रिझवी आणि शेख रशीद या पाच खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं आहे.
