सरफराज खानने त्याचा फिटनेस सुधारण्यासाठी 17 किलो वजन कमी केले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये असंख्य धावा करूनही, सरफराज खानला भारताच्या सीनियर टीममध्ये सोडाच, पण इंडिया ए मध्येही निवडण्यात आलं नाही. मंगळवारी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या सीरिजसाठी इंडिया ए ची घोषणा केली, तेव्हा मुंबईकर सरफराजचं या यादीत नाव नव्हतं. निवड समिती किंवा बीसीसीआयकडून अद्याप या निर्णयाचं कारण देण्यात आलेलं नाही, म्हणूनच ओवेसींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
advertisement
ओवेसी यांनी एका न्यूज पोर्टलची लिंक शेअर केली आणि सरफराज खानला इंडिया ए मध्ये स्थान का नाही? असा सवाल ओवेसींनी विचारला होता.
सरफराज खानने भारतीय टेस्ट टीममध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षांत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 117.47 च्या सरासरीने 2,467 रन केल्या आहेत, ज्यामध्ये दहा शतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी त्याने भारतीय टेस्ट टीममध्ये स्थान मिळवले, आणि पदार्पणाच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. सरफराज हा स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने रन करणारा खेळाडू आहे. सरफराज खानला याआधी त्याच्या वजनावरून लक्ष्य केलं गेलं, पण आता त्याने वजन कमी करून स्वतःचा फिटनेसही दाखवून दिला आहे.