नितीश कुमार रेड्डीचा डेब्यू
टीम इंडियामध्ये सात महिन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे शुभमनच्या कॅप्टन्सीसोबत दोघांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. नितीश कुमार रेड्डी आज आपल्या करियरचा पहिला वनडे सामना खेळणार आहे. ऑलराऊंडर म्हणून तो टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल. तर तीन फास्टर बॉलर्ससोबत टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असल्याने, ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी-फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन दिग्गज खेळाडूंनी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, ज्यामुळे संघात मोठे बदल झाले आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि मिच मार्श यांच्या रूपाने ऑस्ट्रेलियाकडे एक अनुभवी पण स्फोटक सलामीची जोडी आहे.
मिचेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड
बॉलिंगमध्ये देखील मिचेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड ही जोडी अत्यंत घातक आहे. मात्र, या प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त संघात अनेक नवे आणि इन-एक्सपिरियन्स खेळाडू असल्याने, यजमान संघ या सिरीजमध्ये नवीन खेळाडूंसह एक्सपेरिमेन्ट करेल. नुकत्याच झालेल्या ऑफ-सीझन वनडे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया जोर लावेल.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.