टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वी वनडे आणि टी-ट्वेंटी दोन्ही संघांची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांनी दोन्ही संघांमध्ये बदल केले आहेत. तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी सिडनीमध्ये खेळला जाईल, त्यानंतर होणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल केला गेला आहे. मॅक्सवेल पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांनंतर तो संघात सामील होईल. अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी जोश हेझलवूड आणि शॉन अॅबॉट यांना संघातून वगळण्यात आले आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया संघात 9 बदल
हेझलवूड पहिले दोन टी-ट्वेंटी सामने खेळेल आणि अॅबॉट तीन टी-ट्वेंटी सामन्यांनंतर खेळेल. बेन द्वारशुइस चौथ्या आणि पाचव्या टी-ट्वेंटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज माहली बियर्डमनलाही टी-ट्वेंटी सामन्यांसाठी बोलावण्यात आले आहे. तो तिसऱ्या सामन्यापासून संघात सामील होईल. जोश फिलिपला संपूर्ण टी-ट्वेंटी मालिकेसाठी बोलावण्यात आलं आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.
टी-ट्वेंटी सामन्यांचं शेड्यूल
29 ऑक्टोबर: पहिली टी20 मॅच, मनुका ओवल, कॅनबर.
31 ऑक्टोबर: दुसरी टी20 मॅच, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न.
2 नोव्हेंबर: तिसरी टी20 मॅच, बेलेरिव ओवल, होबार्ट ओवल.
6 नोव्हेंबर: चौथी टी20 मॅच, बिल पिप्पल ओवल, गोल्ड कोस्ट.
8 नोव्हेंबर: पाचवी टी20 मॅच, द गाबा, ब्रिस्बेन.
