पहिल्या तासाभरात खेळ खल्लास
चौथ्या दिवसाच्या अखेरीस, टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज असल्याने साई सुदर्शन आणि केएल राहुल पहिल्या तासाभरात खेळ खल्लास आणि मालिका खिशात घालतील, अशी शक्यता होती. मात्र सुदर्शनने आक्रमक खेळण्याच्या नादात विकेट गमावली. तर त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने देखील हवेत बॉल मारला अन् तो देखील आऊट झाला. त्यानंतर मात्र, केएल राहुलने संयमी खेळी केली अन् विजय निश्चित केला.
advertisement
विजयासाठी 121 रनचं आव्हान पार
भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराजला 2 विकेट घेण्यात यश आलं होतं. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 1-1 विकेट मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा 390 रनवर ऑलआऊट झाल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान एका तासातच पार केलं.
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.