कसोटीतील कामगिरीचा विचार नाही
मात्र, यंदाचा आशिया कप T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असल्यामुळे, निवड समिती T20 मॅचमधील खेळाडूंच्या कामगिरीला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. यामुळे कसोटीतील कामगिरीचा विचार केला जाणार नाही. ऑस्ट्रेलिया ज्याप्रमाणे कसोटी आणि टी-ट्वेंटीसाठी वेगळी टीम निवडते, तसाच प्लॅन सिलेक्शन कमिटीने आखल्याचं पहायला मिळत आहे.
अभिषेक आणि संजूची जागा निश्चित
advertisement
ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जागा निश्चित मानली जात आहे. तिसऱ्या ओपनरसाठी यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शुभमन गिलचा मार्ग खडतर होऊ शकतो. मधल्या फळीत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना संधी दिली जाऊ शकते, तर ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती क्रिकबझच्या रिपोर्टनुसार समोर आली आहे.
जसप्रीत बुमराहला संधी, सिराज आऊट
पेस अटॅकबद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराह त्याचे नेतृत्व करेल. बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाला बळ मिळेल. मात्र, T20 फॉरमॅटचा विचार करता मोहम्मद सिराजच्या जागी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णाने अलीकडील आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली होती. भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे, त्यामुळे गिल आणि सिराजच्या भवितव्याबद्दल लवकरच चित्र स्पष्ट होईल.