TRENDING:

भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये जायला परवानगी, BCCI ची IPL च्या एकाच टीमला परमिशन!

Last Updated:

भारतीय क्रिकेटपटूंना अजूनपर्यंत परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही, पण 2026 मध्ये बीसीसीआय या नियमांमध्ये थोडा बदल करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंना अजूनपर्यंत परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही, पण 2026 मध्ये बीसीसीआय या नियमांमध्ये थोडा बदल करणार आहे. आयपीएलच्या फक्त एकाच टीमला त्यांच्या खेळाडूंना परदेशातल्या टी-20 लीगमध्ये घेऊन जायची परवानगी मिळाली आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने त्यांच्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआयकडून घेतली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये जायला परवानगी, BCCI ची IPL च्या एकाच टीमला परमिशन!
भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये जायला परवानगी, BCCI ची IPL च्या एकाच टीमला परमिशन!
advertisement

लखनऊची टीम त्यांच्या काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशी लीगमध्ये पाठवत आहे. लखनऊ त्यांचे फास्ट बॉलर आवेश खान आणि मोहसीन खान यांना दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे. लखनऊचे फास्ट बॉलर SA20 लीग दरम्यान एलएसजी डर्बन सुपरजायंट्सच्या खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेतील.

SA20 लीग 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लीगमध्ये, आवेश आणि मोहसीन खान डर्बन सुपरजायंट्स प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली त्यांचे कौशल्य वाढवतील, कारण त्यांच्यापैकी कोणीही सध्या बीसीसीआय किंवा त्यांच्या राज्य संघांशी करारबद्ध नाही. असे असूनही, कोणत्याही नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी फ्रँचायझीने बीसीसीआयकडून आधीच पूर्व परवानगी घेतली आहे. बीसीसीआयनेही याला मान्यता दिली आहे. आवेश आणि मोहसीन व्यतिरिक्त, नमन तिवारीला देखील दक्षिण आफ्रिकेत पाठवले जाऊ शकते.

advertisement

SA20 लीगमध्ये डरबन टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये लान्स क्लुजनर, टॉम मूडी, भरत अरुण आणि कार्ल क्रो यांचा समावेश आहे. यापैकी तिघं आयपीएलमध्ये लखनऊच्या कोचिंग स्टाफचा भाग आहेत. लखनऊला आवेश आणि मोहसिन खानला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याची गरज आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर आहेत. त्यामुळे, आगामी आयपीएल हंगामापूर्वी, हे दोन्ही बॉलर स्वतःला पूर्णपणे तयार करतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मका आणि कांद्याच्या दरात वाढ, सोयाबीनला काय मिळाला भाव?
सर्व पहा

लखनऊचा फास्ट बॉलर मोहसिन खान दुखापतीमुळे गेल्या हंगामात एकही सामना खेळला नाही. पण, फ्रँचायझीने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आवेश खान आयपीएल 2025 मध्ये दुखापतीनंतर क्रिकेटपासून दूर आहे. दोन्ही खेळाडू सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत आणि त्यांनी हळूहळू बॉलिंग सुरू केली आहे. डरबनचा हा दौरा त्यांच्या फिटनेससाठी खूप उपयुक्त ठरेल. मोहसिन आणि आवेश खान हे दोघंही SA20 लीग मध्ये जाणार असले तरी त्यांना लीगच्या मॅच खेळण्याची परवानगी बीसीसीआयने दिली नाही, हे खेळाडू तिथे फक्त ट्रेनिंगच करू शकतील.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये जायला परवानगी, BCCI ची IPL च्या एकाच टीमला परमिशन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल