प्रतिका रावल जागी संधी, पण...
टीम इंडियाची स्फोटक ओपनर शेफाली वर्मा हिला महिला वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनल मॅचमध्ये दुखापतग्रस्त प्रतिका रावल हिच्या जागी तडकाफडकी टीममध्ये संधी मिळाली होती. ही मॅच टीम इंडियाने जिंकली असली तरी, शेफालीच्या वैयक्तिक कामगिरीमुळे तिच्या करियरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सेमीफायनल मॅचमध्ये शेफाली वर्मा फारशी चमक दाखवू शकली नाही. तब्बल एका वर्षानंतर शेफालीला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, ती देखील तिने गमावल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
शेफालीच्या करियरवर अनेक प्रश्नचिन्ह
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 339 रनच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना ती दुसऱ्या ओव्हरमध्येच 4 रन करून किम गार्थच्या बॉलवर LBW आऊट झाली. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तिला लेडी सेहवागच्या तिच्या नावाला साजेसा आक्रमक अंदाज दाखवता आला नाही आणि ती लवकर बाद झाली. त्यामुळे आता तिच्या करियरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रतिका रावल फिट झाल्यानंतर ओपनरच्या जागेसाठी शेफालीला तिच्याशी थेट स्पर्धा करावी लागेल. प्रतिकाने या वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधानासोबत 212 रनची विक्रमी पार्टनरशिप केली होती, ज्यामुळे शेफालीवर आता अधिक रन करण्याचा दबाव असेल.
संयम दाखवणे अपेक्षित
टी20 आणि वनडे या दोन वेगवेगळ्या प्रारूपांसाठी ती स्वतःला कशी जुळवून घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वनडेमध्ये फक्त आक्रमक बॅटिंग न करता, इनिंग्ज मोठी करणे आणि संयम दाखवणे अपेक्षित असते. शेफाली अजूनही तरुण आहे आणि तिच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने WPL आणि वनडे मॅचमध्ये मोठी खेळी करून 115 बॉलमध्ये 197 रन बंगालविरुद्ध आपली क्षमता सिद्ध केली होती.
शेफालीची खरी परीक्षा सुरू
दरम्यान, शेफालीला टीम इंडियामध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवून वनडेमध्ये सातत्याने मोठे स्कोर करावे लागतील. तिची शैली धोकादायक असली तरी, तिने थोडा संयम दाखवल्यास ती प्रतिस्पर्धी टीमसाठी अजूनही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तिचे करियर संपलेले नाही, तर आता तिची खरी परीक्षा सुरू झाली आहे, जिथे तिला आक्रमकता आणि संयम यांचा योग्य समतोल साधावा लागेल.
