TRENDING:

SRH VS KKR : SRH हरली आणि मालकीण काव्या मारनला भर मैदानात अश्रू अनावर Video

Last Updated:

हैदराबादचा दारुण पराभव झाल्यानंतर मालकीण काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2024 चा फायनल सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवून आयपीएल 2024 चं विजेतेपद मिळवलं आहे. यासह केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियन टीम ठरली. मात्र इतक्या महत्वाच्या सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव झाल्यानंतर मालकीण काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
SRH हरली आणि मालकीण काव्या मारनला भर मैदानात अश्रू अनावर Video
SRH हरली आणि मालकीण काव्या मारनला भर मैदानात अश्रू अनावर Video
advertisement

चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर केकेआरला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले होते. यावेळी हैदराबादच्या टीमने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 1 14 धावांचं सोपं आव्हान मिळालं.

advertisement

विजयासाठी मिळालेलं टार्गेट कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी अवघ्या 11 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. केकेआरने 8 विकेट्स राखून हैदराबादवर विजय मिळवला आणि आयपीएल 2024 ची चॅम्पियन टीम ठरली. संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी करून अनेक मोठे विक्रम रचणारी सनरायजर्स हैदराबादची टीम मात्र फायनल सामन्यात फ्लॉप ठरली. त्यांचा कोणताही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांना देखील विकेट्स काढण्यात यश आले नाही, आणि परिणामी त्यांचा पराभव झाला. हा पराभव हैदराबादच्या टीमची मालकीण काव्या मारन हिच्या जिव्हारी लागला.

advertisement

सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव झाल्यानंतर स्टॅन्डमध्ये बसलेल्या काव्याला अश्रू अनावर झाले. तिचे हे अश्रू कॅमेऱ्याने टिपले. मात्र त्यानंतर अश्रू पुसत तिने विजयी झालेल्या केकेआरच्या संघासाठी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले. काव्या मारन ही टीमची मालकीण असून ऑक्शनचं टेबल असो अथवा मॅच दरम्यान मैदानात टीमला चिअर करणं असो ती नेहमीच सनरायजर्स हैदराबाद टीमच्या सोबत खंबीरपणे उभी असते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH VS KKR : SRH हरली आणि मालकीण काव्या मारनला भर मैदानात अश्रू अनावर Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल