फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायजर्सची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त 21 धावात तंबूत परतले होते. पॉवर प्लेमध्ये सर्वोच्च धावा काढण्याचा विक्रम नावावर असलेली जोडी महत्त्वाच्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. हैदराबादचा डाव फक्त 113 धावात आटोपला. त्यानंतर केकेआरने फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात 11 षटकातच सामना खिशात घातला.
advertisement
कमिन्सने सांगितलं SRHच्या पराभवाचं कारण, म्हणाला, ही खेळपट्टी अशी नव्हती जिथं...
कोणाला कोणता पुरस्कार? किती बक्षिस?
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन - नितीश रेड्डी, 10 लाख
बेस्ट स्ट्राइक रेट - जेक फ्रेजर-मॅकगर्क - 10 लाख
फँटसी प्लेअर ऑफ द सीजन - सुनील नरेन, 10 लाख
हंगामात सर्वाधिक चौकार - ट्रॅव्हिस हेड, 10 लाख
कॅच ऑफ द सीजन, रमनदीप सिंह, 10 लाख
फेअर प्ले अवॉर्ड - सनरायजर्स हैदराबाद, 10 लाख
पर्पल कॅप - हर्षल पटेल, 10 लाख
ऑरेंज कॅप - विराट कोहली, 10 लाख
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर - सुनील नरेन, 10 लाख
पिच आणि ग्राउंड पुरस्कार - हैदराबाद, 50 लाख
फायनलमध्ये पुरस्कार पटकावणारे खेळाडू
स्ट्रायकर ऑफ द मॅच - व्यंकटेश अय्यर, 1 लाख
सुपर सिक्सेस इन द मॅच - व्यंकटेश अय्यर, 1 लाख
सर्वाधिक चौकार - रहमानुल्लाह गुरबाज, 1 लाख
ग्रीन डॉट बॉल - हर्षित राणा, 1 लाख
प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क, 5 लाख
कमिन्सचा अंदाज चुकला, विजेतेपद हुकले
आयपीएलच्या १७ व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची सर्वात मोठी ताकद फलंदाजी होती. पण फायनलमध्ये पॅट कमिन्सची मोठी चूक झाली. त्याला खेळपट्टीचा अंदाज आला नाही आणि संघाला फक्त ११३ धावाच करता आल्या. या सामन्यात केकेआरने एकतर्फी विजय मिळवून तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.