कमिन्सने सांगितलं SRHच्या पराभवाचं कारण, म्हणाला, ही खेळपट्टी अशी नव्हती जिथं...

Last Updated:

फायनलमध्ये सनरायजर्सच्या नावावर नकोसा विक्रम झाला. त्यांनी फायनलमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्या नोंदवली. केकेआरविरुद्ध पराभवानंतर पॅट कमिन्सने पराभवाची कारणे सांगितली.

News18
News18
चेन्नई : यंदाच्या आयपीएल हंगामात सुरुवातीपासून चांगली कामगिरी केलेल्या सनरायजर्स हैदराबादला अंतिम सामन्यात दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. फायनलमध्ये सनरायजर्सच्या नावावर नकोसा विक्रम झाला. त्यांनी फायनलमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्या नोंदवली. केकेआरविरुद्ध पराभवानंतर पॅट कमिन्सने पराभवाची कारणे सांगितली. केकेआरने फायनलमध्ये मोठा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. केकेआरचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. फायनलमध्ये पराभवानंतर पॅट कमिन्सने म्हटलं की, त्यांनी आम्हाला सामन्यातून बाहेर ढकललं होतं. आम्ही धावा कमी केल्या. ही खेळपट्टी 200 पेक्षा जास्त धावा करता येण्यासारखी नव्हती असंही कमिन्सने म्हटलं.
पॅट कमिन्स म्हणाला की, केकेआरने जबरदस्त गोलंदाजी केली. दुर्दैवाने जुना सहकारी मिशेल स्टार्कने पुन्हा चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. आज चांगले खेळलो नाही आणि पराभव पत्करला. तुम्हाला आशा असते की काही चांगले फटके मारू पण त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि आमच्या हाती काहीच लागलं नाही. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्येही असंच झालं. त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली आणि त्याचं श्रेय त्यांनाच जातं. आम्ही 160 धावा केल्या असत्या तर आम्ही सामन्यात असतो. 200 प्लसची खेळपट्टी वाटली नाही. थोड्या अधिक धावा असत्या तर आम्हाला संधी मिळाली असती असंही कमिन्सने म्हटलं.
advertisement
फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायजर्सची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त 21 धावात तंबूत परतले होते. पॉवर प्लेमध्ये सर्वोच्च धावा काढण्याचा विक्रम नावावर असलेली जोडी महत्त्वाच्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. हैदराबादचा डाव फक्त 113 धावात आटोपला. त्यानंतर केकेआरने फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात 11 षटकातच सामना खिशात घातला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कमिन्सने सांगितलं SRHच्या पराभवाचं कारण, म्हणाला, ही खेळपट्टी अशी नव्हती जिथं...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement