IPL आणि WPL फायनलमध्ये असे योगायोग तुम्हीही म्हणाल सेम टू सेम! कॅप्टन, टॉस, स्कोअरकार्ड ते निकाल

Last Updated:

इंडियन प्रीमियर लीग आणि महिला प्रीमियर लीगच्या 2024 च्या अंतिम सामन्यात एक आगळावेगळा असा योगायोग बघायला मिळाला. एक दोन नव्हे तर चार योगायोग दोन्ही सामन्यात दिसून आले.

News18
News18
मुंबई : आयपीएल 2024 विजेतेपद केकेआरने पटकावलं. दहा वर्षांनी पुन्हा एकदा केकेआरने नाव कोरलं. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग आणि महिला प्रीमियर लीगच्या 2024 च्या अंतिम सामन्यात एक आगळावेगळा असा योगायोग बघायला मिळाला. एक दोन नव्हे तर चार योगायोग दोन्ही सामन्यात दिसून आले. महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद आरसीबीने पटकावलं. त्यामुळे यंदा आरसीबीचा पुरुष संघ विजेतेपद पटकावणार का याची उत्सुकता सर्वांना होती. पण आरसीबीला क्वालिफायर दोन सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवून आरसीबीने विजेतेपद पटकावलं होतं. या सामन्यात दिल्लीची कर्णधार ऑस्ट्रेलियन मेग लॅनिंग होती तर आरसीबीची कर्णधार भारतीय स्मृती मानधना होती. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या संघाला १८.३ षटकात ११३ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. तर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या महिला संघाने ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
advertisement
महिला प्रीमियर लीगच्या फायनलप्रमाणेच पुरुषांच्या आयपीएल फायनलमध्येही स्कोअरकार्ड बघायला मिळालं. हा सामनाही ऑस्ट्रेलियन कर्णधार विरुद्ध भारतीय कर्णधार असा झाला. हैदराबादचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स करत होता. त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. तर केकेआरचं नेतृत्व भारतीय असलेल्या श्रेयस अय्यरकडे होतं. अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने हैदराबादला ११३ धावात गुंडाळलं. १८.३ षटकातच हैदराबादचे १० गडी बाद केले. त्यानंतर ८ विकेट राखून सामना जिंकला आणि ट्रॉफिवर तिसऱ्यांदा नाव कोरलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL आणि WPL फायनलमध्ये असे योगायोग तुम्हीही म्हणाल सेम टू सेम! कॅप्टन, टॉस, स्कोअरकार्ड ते निकाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement