आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये आरसीबीने एकूण 8 खेळाडूंना विकत घेतलं, यापैकी फक्त व्यंकटेश अय्यर हेच नाव ओळखीचं आहे. व्यंकटेश अय्यरसाठी आरसीबीने 7 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या मागच्या मोसमात केकेआरकडून खेळलेल्या व्यंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी मिळाले होते, पण आता अय्यरचा भाव 15 कोटींनी कमी झाला आहे.
व्यंकटेश अय्यर वगळता आरसीबीने जेकब डफी, सात्विक डेस्वाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओत्सवाल, विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान यांना विकत घेतलं आहे. आयपीएल लिलावानंतर आता आरसीबीकडे 25 लाख रुपये शिल्लक आहेत. आयपीएल 2026 च्या लिलावाआधी आरसीबीकडे 16 कोटी 40 लाख रुपये शिल्लक होते, यात त्यांना 6 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू विकत घ्यायचे होते.
advertisement
आयपीएल 2026 साठी आरसीबीची टीम
रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, स्वप्निल सिंग, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, जॉश हेजलवूड, यश दयाळ, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, सात्विक ओत्सवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
