TRENDING:

IPL 2026 : 'आम्हाला पाकिस्तानी खेळाडू हवे होते...', BCCI ने हात झटकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचचा मोठा खुलासा!

Last Updated:

Hemang Badani On Pakistani cricketers : सनरायझर्स लीड्स वादाच्या दरम्यान साउदर्न ब्रेव्हचे हेड कोच हेमांग बदानी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistani players in The Hundred : आगामी आयपीएल 2026 पूर्वी 'द हंड्रेड' लीगच्या ऑक्शनमध्ये मोठा राडा पहायला मिळाला. पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदला सनरायझर्स लीड्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. अबरारच्या लिलावामुळे तो 'द हंड्रेड' लीगच्या भारतीय मालकीच्या टीमकडून खेळणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. मात्र, या निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून क्रिकेट फॅन्सने सनरायझर्सवर टीका केली आहे. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचने खळबळजनक खुलासा केलाय.
Hemang Badani want to buy Pakistani cricketers
Hemang Badani want to buy Pakistani cricketers
advertisement

काव्या मारन वादाच्या भोवऱ्यात, बीसीसीआयने हात झटकले

'द हंड्रेड' लीगमध्ये सनरायझर्स लीड्स ही टीम आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादची सिस्टर फ्रेंचायझी असून काव्या मारन या टीमच्या सीईओ आहेत. अबरारला खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझीने 1.90 लाख पाऊंड (सुमारे 2.34 कोटी रुपये) मोजले आहेत. या व्यवहारानंतर काही तासांतच सोशल मीडियावर वाद निर्माण झाला अन् सनरायझर्स लीड्सचे अधिकृत X (ट्विटर) अकाउंट सस्पेंड झाल्यानं या वादात आणखी भर पडली. तर बीसीसीआयने या प्रकरणावरून हात झटकले आहेत.

advertisement

हेमांग बदानी यांचं मोठं वक्तव्य

सनरायझर्स लीड्स या वादाच्या दरम्यान साउदर्न ब्रेव्हचे हेड कोच हेमांग बदानी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. आमच्याही टीमच्या ऑक्शन लिस्टमध्ये देखील काही पाकिस्तानी खेळाडूंची नावं सामील होती, असं हेमांग बदानी यांनी म्हटलं आहे. बदानी हे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे देखील हेड कोच आहेत, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधलं गेलंय.

advertisement

पाकिस्तानी प्लेयर्सला खेळवायला BCCI कडून 'ग्रीन सिग्लन'? काव्या मारनला 'क्लिन चीट', राजीव शुक्लांनी दोन वाक्यात विषय संपवला!

एका दर्जेदार स्पिनरची गरज

बदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साउदर्न ब्रेव्हला ऑक्शनमध्ये एका दर्जेदार स्पिनरची गरज होती. यासाठी त्यांनी परदेशी आणि स्थानिक अशा दोन्ही पर्यायांचा विचार केला होता.आमच्या लिस्टमध्ये काही खास खेळाडू होते आणि आमचा मुख्य उद्देश एक मजबूत स्क्वॉड तयार करणं हाच होता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

advertisement

आदिल रशीदला 2.5 लाख पाऊंडमध्ये खरेदी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

अखेर साउदर्न ब्रेव्हने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदला 2.5 लाख पाऊंडमध्ये खरेदी केलं अन् पाकिस्तानी प्लेयरला कुणीही बोली लावली नाही. पाकिस्तानचे अनेक प्लेयर्स या लीग ऑक्शनमधून रिकाम्या हाताने परत आल्याचं देखील समोर आलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'आम्हाला पाकिस्तानी खेळाडू हवे होते...', BCCI ने हात झटकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचचा मोठा खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल