TRENDING:

ईशान किशनला लागली लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती, मुंबईच्या खेळाडूचंही नशीबही चमकलं

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अनधिकृत वनडे सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच बक्षीस म्हणून ईशान किशनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ईशान किशनसोबत एका मुंबईच्या खेळाडुच देखील नशीब चमकलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ishan kishan-
ishan kishan-
advertisement

Ishan Kishan : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ईशान किशन याला मोठी लॉटरी लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अनधिकृत वनडे सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच बक्षीस म्हणून ईशान किशनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ईशान किशनसोबत एका मुंबईच्या खेळाडुच देखील नशीब चमकलं आहे.कारण मुंबईच्या खेळाडूला संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान ईशान किशनकडे कोणत्या संघाचे कर्णधार पद देण्यात आलं आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत अ संघाकडून अर्धशतक झळकावणाऱ्या ईशान किशनला सय्यद मुश्ताक अली स्पर्धा 2025 मध्ये झारखंडचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही स्पर्धा 26 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये होणार आहे. झारखंडचा पहिला सामना हा दिल्लीविरूद्ध असणार आहे.

advertisement

शान किशन सय्यद मुश्ताक अली स्पर्धा 2025 मध्ये झारखंडचा कर्णधार असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत शान भारत अ संघाचा भाग होता. तिसऱ्या सामन्यात ईशाने 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच बक्षिस आता त्याला मिळालं आहे.

advertisement

दरम्यान ईशान किशन बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याने 28 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाजाची कामगिरी खराब होती आणि तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शानने देशांतर्गत स्पर्धांमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयने शानला केंद्रीय करारातून काढून टाकले. इशान यावेळी केंद्रीय करारात परतला असला तरी, त्याला अद्याप भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

advertisement

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करून इशान किशनला भारताच्या टी20 संघात परतण्याची सुवर्णसंधी आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय भूमीवर टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. जर इशान या देशांतर्गत टी20 स्पर्धेत धावा काढण्यात यशस्वी झाला तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकतात. जर इशानची बॅट बोलली तर त्याचा फायदा आयपीएल 2026 च्या लिलावात होऊ शकतो.

मुंबईच्या खेळाडूला संधी

झारखंडने सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. इशान किशन आणि कुमार कुशाग्र यांना अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. विराट सिंग आणि अनुकुल रॉय सारख्या प्रमुख खेळाडूंसह मुंबई इंडियन्सचा खेळाडू रॉबिन मिंझचाही संघात समावेश आहे.

झारखंडचा संघ:

ईशान किशन (कर्णधार-विकेटकीपर), उत्कर्ष सिंग, विराट सिंग, कुमार कुशाग्र (उपकर्णधार), रॉबिन मिंझ, अनुकुल रॉय, पंकज कुमार, बाला कृष्णा, मोहम्मद कोनन कुरेशी, शुभम शर्मा, अमित कुमार, मनीषी, सुशांत मिश्रा, विकास सिंग, सौरभ शेखर आणि राजनदीप सिंग.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जिथं रक्त सांडलं, तिथंच फिरवला बुलडोझर, छ. संभाजीनगरात धडक कारवाई, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ईशान किशनला लागली लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती, मुंबईच्या खेळाडूचंही नशीबही चमकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल