टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन गेल्या अनेक वर्षापासून भारतीय संघापासून दूर आहे.या दरम्यान तो देशांतर्गत क्रिकेट आणि विविध लीगमध्ये खेळताना दिसतोय.या दरम्यान तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो आहे. अशात रणजी ट्ऱॉफी स्पर्धेला आजपासून सूरूवात झाली आहे.या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तामिळनाडू विरूद्ध खेळताना झारखंडचा कर्णधार आणि विकेटकिपर ईशान किशनने खणखणीत शतक ठोकलं आहे. पाचव्या नंबरवर मैदानात उतरलेल्या ईशान किशनने खतरनाक खेळी केली. ईशान किशन या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 125 धावांवर नाबाद खेळतो आहे. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 14 चौकार मारले आहेत.
advertisement
खरं तर झारखंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण झारखंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण शिखर मोहन अवघ्या 10 धावांवर बाद झाला होता.त्याच्या पाठोपाठ कुमार सुरज 3 धावांवर बाद झाला होता. शरणदिप सिंह आणि विराट सिंहने झारखंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.पण दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. शरणदिप सिंह 48 धावांवर तर विराट सिंह 28 धावांवर बाद झाला होता.
त्यानंतर कर्णधार ईशान किशनची मैदानात एंन्ट्री झाली होती.त्याने मैदानात उतरताच एका बाजूने भारताचा डाव सावरला होता. कारण एका बाजूने विकेट पडत होत्या. कुमार कुषाग्र 11 धावांवर बाद झाला,त्या पाठोपाठ अनुकूल रॉय 12 वर बाद झाला.त्यानंतर मैदानात आलेल्या साहिल राजने ईशान किशनसोबत पार्टनरशीप करत धावा वाढवल्या. आता पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ईशान किशन 125 धावांवर नाबाद राहिला आहे. त्याच्यासोबत साहिल राज 64 धावांवर नाबाद खेळतोय. या बळावर उत्तराखंडचा डाव पहिला दिवसअखेर 6 विकेट गमावून 307 धावापर्यंत पोहोचला आहे.
तामिळनाडू कडून गूरूजापनीत सिंहने 3 विकेट घेतल्या आहेत. तर डी चंद्रशेखरने 2 आणि संदिप वॉरीयरने 1 विकेट घेतली आहे.आता झारखंडला ऑल आऊट करण्यासाठी तामिळनाडूला आणखी 4 विकेटसची गरज आहे. आता तामिळनाडू झारखंडला किती धावात रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.