TRENDING:

Ishan Kishan : '...म्हणून मी रागात खेळलो अन् सेलिब्रेशन केलं', ईशान किशनला फायनलपूर्वी कशी कळाली बहिणीच्या निधनाची बातमी?

Last Updated:

Ishan Kishan On Cousin Sisters Car Accident Death : फायनलच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी इशान किशनच्या चुलत बहिणीचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ishan Kishan On Cousin Sisters Death : टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अहमदाबादमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा होत असतानाच ईशान किशन याने एक शॉकिंग खुलासा केला. फायनल मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 54 रन्सची वादळी खेळी करणाऱ्या इशानने विजयानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:ख व्यक्त केलं. या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरलेल्या इशानने आपल्या चुलत बहिणीला हा विजय समर्पित केला.
Ishan Kishan On Cousin Sisters Car Accident Death
Ishan Kishan On Cousin Sisters Car Accident Death
advertisement

चुलत बहिणीचा कार अपघातात मृत्यू

इशान किशनने सामन्यानंतर सांगितले की, फायनलच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी त्याच्या चुलत बहिणीचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला होता. प्रॅक्टिस सेशन सुरू असतानाच त्याला ही अत्यंत धक्कादायक बातमी समजली होती. ही माहिती मिळाल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता, मात्र त्याने ही गोष्ट कोणालाही न सांगता देशासाठी मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.

advertisement

हार्दिक पांड्याचा ईशानला खांदा

या कठीण प्रसंगात हार्दिक पांड्या इशानच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. इशानने हार्दिकचे आभार मानताना म्हटलं की, "हार्दिक भाईने मला सावरलं. त्याने मला सांगितलं की, ही परिस्थिती सोपी नाही, पण आपल्याला टीमसाठी एकमेकांना आधार द्यावा लागेल." हार्दिकच्या या पाठिंब्यामुळेच ईशानला मैदानात स्वतःला सिद्ध करण्याची आणि दुःखाचे रूपांतर प्रेरणेत करण्याची मोठी ताकद मिळाली.

advertisement

Rinku Singh : ' मुलाची ताकद फक्त वडिलांसाठी....', वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिंकु सिंगच्या भावी पत्नीची भावुक पोस्ट चर्चेत!

मी रागात खेळत होतो...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, शेतकऱ्यानं काय केलं? V
सर्व पहा

आपल्या खेळीबद्दल बोलताना ईशान किशन म्हणाला की, माझी बहीण नेहमीच मला मोठी खेळी करताना पाहू इच्छित होती. त्यामुळेच मी रागात खेळत होतो. 50 रन्स पूर्ण केल्यानंतर मी आकाशाकडे पाहून आपली ही खेळी बहिणीला समर्पित केली. "आजचा दिवस मोठा होता आणि तिच्यासाठी रन्स करणं हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मला वाटलं," अशा शब्दांत इशान किशनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ishan Kishan : '...म्हणून मी रागात खेळलो अन् सेलिब्रेशन केलं', ईशान किशनला फायनलपूर्वी कशी कळाली बहिणीच्या निधनाची बातमी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल