जेमिमाने अखेरपर्यंत झुंज...
पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर जेमिमा रोड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीमचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 167 रनची निर्णायक भागीदारी केली. जेमिमाने अखेरपर्यंत झुंज दिली. त्यामुळे जेमिमाच्या जर्सीला माती लागली होती. त्याचा फोटो व्हायरल झाला. तर दुसरीकडे टीम इंडियाचा सध्याचा हेड कोच गौतम गंभीर याचा 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमधील जर्सीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची जर्सी देखील वर्ल्ड कप जिंकवताना अशीच मळलेली होती.
advertisement
गौतम गंभीरची सोशल मीडियावर पोस्ट
टीम इंडियाच्या विजयानंतर मेन्स टीमचा हेड कोच गौतम गंभीर याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्याने टीम इंडियाच्या पोरींचं कौतूक केलं. 'ते संपल्याशिवाय संपत नाही. मुलींनो खूप चांगली कामगिरी केली', असं गौतम गंभीर म्हणाला. गंभीरने देखील पोरींना कौतुकाची थाप दिली. तसेच सचिन तेंडूलकर आणि इतर दिग्ग्जांनी देखील ट्विट करत पोरींची पाठ थोपटली आहे.
2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकेशी फायनल
दरम्यान, जेमिमा रोड्रिग्जला तिच्या मॅच-विनिंग शतकासाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. या विजयामुळे भारताचा फायनलमध्ये प्रवेश झाला असून, त्यांचा सामना आता 2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाला लीग स्टेजमध्ये हरवलं होतं. त्याचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. जरी कोणतीही टीम जिंकली तरी देखील 25 वर्षानंतर नवी वर्ल्ड कप चॅम्पियन टीम मिळणार आहे.
