जेमिमा भावूक, अजूनही विश्वास बसत नाही
जेमिमाने सांगितलं की, "मी हे एकटी करू शकले नाही, आज त्यानेच मला साथ दिली."जेमिमा भावूक झाली आणि म्हणाली की, "माझी आई, वडील, कोच आणि या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते. हे मागील चार महिने खूप कठीण होते, पण आता हे स्वप्नवत वाटत आहे आणि अजूनही विश्वास बसत नाहीये." असं म्हणताना जेमिमाच्या अश्रूंचा बांध फुटला.
advertisement
मानसिकदृष्ट्या मी ठीक नव्हते - जेमिमा
मागील वर्षी मला या वर्ल्ड कपमधून ड्रॉप करण्यात आले होते. यावर्षी मी चांगली फॉर्म घेऊन आले होते, पण एकामागून एक गोष्टी घडत गेल्या आणि मी काहीही नियंत्रित करू शकले नाही. या संपूर्ण टूरमध्ये मी जवळजवळ रोज रडली आहे. मानसिकदृष्ट्या मी ठीक नव्हते आणि मला खूप अँक्झायटी येत होती. टीममधून ड्रॉप होणे हे आणखी एक आव्हान होते. पण मला फक्त मैदानावर उपस्थित राहायचे होते आणि देवाने बाकी सर्व गोष्टींची काळजी घेतली, असं जेमिमा म्हणाली.
आतापर्यंत जे काही घडलं.....
आजचा दिवस माझ्या 50 किंवा माझ्या 100 बद्दल नव्हता. आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता. मला माहित आहे की मला काही संधी मिळाल्या, पण मला वाटते की देवाने योग्य वेळी सर्व काही जुळवून आणले आणि जर तुम्ही योग्य हेतूने काही केले, तर तो नेहमी आशीर्वाद देतो. आणि आतापर्यंत जे काही घडले, ती फक्त याचीच तयारी होती, असं जेमिमा म्हणाली.
मी बायबलमधील एक वचन बोलत होते...
दरम्यान, सुरुवातीला मी फक्त फोक्स्ड राहण्याचा प्रयत्न करत होते. पण शेवटी, मी बायबलमधील एक वचन बोलत होते, कारण माझी एनर्जी संपली होती, मी खूप थकले होते. ते वचन होते, 'शांत उभे राहा आणि देव तुमच्यासाठी लढेल.' आणि मी तेच केले. मी तिथे उभी राहिले आणि तो माझ्यासाठी लढला, असं म्हणत जेमिमाने जीझसचे आभार मानले.
