महिन्याभरापूर्वीच भारताने आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकली, या विजयात कुलदीप यादवने मोलाचं योगदान दिलं होतं. कोणतीही दुखापत झालेली नसताना, तसंच पूर्णपणे फिट असतानाही कुलदीप यादवला भारतामध्ये परत का पाठवण्यात आलं? याबद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.
'भारतीय टीम मॅनेजमेंटने कुलदीप यादवला सोडण्याची विनंती केली होती. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 सीरिजऐवजी कुलदीपला दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध सुरू असलेल्या सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळावी, असं भारतीय टीम मॅनेजमेंटला वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजआधी कुलदीपला टेस्ट क्रिकेटसाठी तयार करणं गरजेचं आहे, असं भारतीय टीम मॅनेजमेंटला वाटत आहे', असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
कुलदीपचा बदली कोण?
कुलदीप यादव भारतात परत येत असल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन सामन्यांसाठी भारतीय टीममध्ये वरुण चक्रवर्ती हा फक्त एक स्पेशलिस्ट स्पिनर आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना स्पिन बॉलिंगची जबाबदारी पार पाडावी लागेल. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. पहिली टेस्ट कोलकात्यामध्ये तर दुसरी टेस्ट 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये होणार आहे. टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.
