नाव होतं म्हणून मला...
सिंकदर शेख याला जामीन मिळाल्यानंतर फॅन्ससाठी पैलवानाने सोशल मीडिया पोस्ट करून एका वाक्यात आपली बाजू मांडली आहे. नाम था इसलिये बदनाम कर पाये (नाव होतं म्हणून बदनाम करता आलं) असं सिकंदर शेखने फोटो शेअर करत म्हटलं आहे. सिकंदरने यावेळी #heaters असा किवर्ड देखील वापरला आहे. सिकंदरच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केलंय.
advertisement
सिकंदरचा जामीन मंजूर
पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर चौघांपैकी सिकंदरचा जामीन मंजूर झाला होता. सिकंदर शेखच्या नावावर कोणताही गुन्हा नव्हता. आता पहिल्यांदाच असा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
सुप्रिया सुळेंचा पंजाबचे मुख्यमंत्र्यांना फोन
दरम्यान, सिकंदर शेखसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना फोन करून चर्चा केली होती. या प्रकरणात योग्य ती माहिती घेऊ, असं आश्वासन भगवंत मान यांनी दिलं होतं. अशातच जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. तर रोहित पवार यांनी देखील ट्विट करत सिकंदरच्या जामीनासाठी आवाज उठवला होता.
