स्मितहास्य करत म्हणाली, I won't be there...
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, जेव्हा तिला पुढील वर्ल्ड कप सायकलमधील तिच्या सहभागाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ॲलिसा हिली स्मितहास्य करत म्हणाली, I won't be there... म्हणजेच मी त्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. 35 वर्षीय खेळाडूच्या या विधानाने तिचे एकदिवसीय क्रिकेटमधील करियर संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षभरात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप वर लक्ष केंद्रित करणार असल्याचे तिने सांगितले, पण त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये लवकरच बदल दिसायला मिळतील, असंही तिने नमूद केलं आहे.
advertisement
आम्ही पुरेसा प्रेशर तयार केला पण...
ॲलिसा हिलीने संघाच्या कामगिरीवर बोलताना सांगितले की, संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक खेळाडूने खूप चांगले प्रदर्शन केले, त्यामुळे आज इथं पराभूत होऊन उभं राहणं खूप निराशाजनक आहे. आम्ही पुरेसा प्रेशर तयार केला, संधी निर्माण केल्या, पण महत्त्वाच्या क्षणी त्याचा फायदा घेता आला नाही. विशेषत: बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये काही चुका झाल्याचे तिनं कबूल केलं. मात्र, युवा खेळाडूंच्या शतकी खेळीकडे बघून ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचे भविष्य उज्जवल असेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
जे काही होतं ते हेच होतं
दरम्यान, हा सामना आम्ही जवळजवळ दुसऱ्या शेवटच्या ओव्हरपर्यंत आणला होता, पण शेवटी आम्ही कमी पडलो. आम्ही 330 चा स्कोर केला होता, जो एका चांगल्या विकेटवर पुरेसा होता. जर आम्ही आमलात करण्यात यशस्वी झालो असतो आणि कॅच पकडले असते, तर आम्ही मॅचमध्ये नक्कीच होतो, पण आम्ही ते करू शकलो नाही. ती म्हणाली, 'पण आता काय बोलणार, जे काही होतं ते हेच होतं.' प्रतिस्पर्धी भारतीय संघाने खूप चांगला खेळ केला आणि दबावाखालीही त्यांनी शांत राहून धावगती वाढवली आणि शेवटी ते लाईन पार करून गेले, असे म्हणत हिलीने भारतीय खेळाडूंचे कौतुक केलं.
