श्रीलंकेकडून शेवटचं षटक घेऊन वेललागे (Wellalage) आला होता. यावेळी वेलालागेच्या पहिल्याच बॉलपासून नबीने प्रहार करायला सुरूवात केली होती. त्यामुळे त्याने सुरूवातीला तीन हॅट्ट्रीक सिक्स मारले त्यानंतर एक बॉल नो पडला.त्यानंतर पुन्हा त्याने दोन षटकार मारले. त्यानंतर नबी सहा बॉल सहा सिक्सचा रेकॉर्ड करेल असे वाटत होते. मात्र शेवटच्या चेंडुवर तो रनआऊट झाला.
advertisement
काय झाले ओव्हरमध्ये...
१९.१ ओव्हर: वेललागेने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर नबीने लाँग-ऑफच्या दिशेने सहजपणे षटकार मारून जोरदार सुरुवात केली.
१९.२ ओव्हर: वेललागेने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नबीने चेंडू ओळखला आणि डीप मिड-विकेटच्या वरून दुसरा षटकार मारला.
१९.३ ओव्हर: वेललागेने गोलंदाजीची दिशा बदलून ओव्हर द विकेट येण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नबीने पुन्हा एकदा लाँग-ऑफच्या दिशेने ८८ मीटर लांब षटकार मारून तिसरा षटकार नोंदवला.
१९.४ ओव्हर: वेललागेने चेंडू नबीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्याने नो-बॉल टाकला. फ्री-हिटवरही नबी थांबला नाही आणि जोरदार फटका मारत वाईड लाँग-ऑफच्या वरून चौथा षटकार ठोकला. याच षटकाराने त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले.
१९.५ ओव्हर: नबीने आपला धडाका कायम ठेवला. वेललागेने पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला आणि नबीने काऊ कॉर्नरच्या दिशेने प्रचंड मोठा षटकार मारत षटकातील पाचवा षटकार पूर्ण केला. यानंतर वेललागे हताश झाल्याचे स्पष्टपणे दिसले.
१९.६ ओव्हर: एकाच षटकात सहा षटकार मारण्याच्या विक्रमापासून केवळ एक षटकार दूर असताना, वेललागेने अखेर एक अचूक यॉर्कर टाकला. नबीने तो चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला आणि दुसऱ्या धावेसाठी धावला. पण कुशल परेराच्या चांगल्या थ्रोमुळे आणि कुशल मेंडिसने चेंडू स्टंपवर आदळून त्याला धावबाद केले.
या दरम्यान मोहम्मद नबीने 22 बॉलमध्ये 60 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. त्याच्या या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तान 8 विकेट गमावून 169 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे आता श्रीलंकसमोर 170 धावांचे आव्हान आहे.