मी फोन करणार नाही, त्यांनी करावा
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमीने त्याच्या फिटनेसबद्दलच्या वृत्तांना फेटाळून लावलं आहे. माझ्यासोबत चर्चा करणं ही निर्णय घेणाऱ्यांची जबाबदारी आहे, जी त्यांनी अद्याप केलेली नाही. भारतीय टीम मॅनेजमेंट माझ्या फिटनेसबद्दल माझ्याशीच बोललेलं नाही. मी त्यांना माझ्या फिटनेसबद्दल सांगणार नाही, त्यांनी मला विचारावं, अशी संतप्त प्रतिक्रिया शमीने दिली आहे.
advertisement
'जर मी 4 दिवसांचा रणजी ट्रॉफीचा सामना खेळू शकतो, तर 50 ओव्हरची मॅच का खेळू शकत नाही? जर मी फिट नसतो, तर एनसीएमध्ये असतो, इथे रणजी ट्रॉफी खेळत नसतो', असं शमी म्हणाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीमची निवड केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकरने फिटनेस नाही, तर कमी क्रिकेट खेळल्याचं कारण सांगितलं होतं.
आगरकर शमीबद्दल काय म्हणाला?
निवड समिती प्रमुख अजित आगरकरला शमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 'माझ्याकडे शमीबद्दल कोणतेही अपडेट नाहीत. तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळला आहे, पण मागच्या दोन-तीन वर्षात तो जास्त क्रिकेट खेळलेला नाही. मला वाटतं त्याने बंगालसाठी एक सामना आणि दुलीप ट्रॉफीमध्ये एक सामना खेळला. खेळाडू म्हणून शमी काय करू शकतो? हे आपल्याला माहिती आहे, पण त्याला क्रिकेट खेळावे लागेल', असं अजित आगरकर म्हणाला.
भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
भारताची टी-20 टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा