जो खेळाडू आपल्या देशासाठी.... - मोहम्मद युसूफ
रविवारी झालेल्या एशिया कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद युसूफवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याचे हे विधान अत्यंत खालच्या पातळीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं. वाढता वाद पाहून युसूफने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्याने स्पष्टपणे सूर्यकुमारचे नाव घेतलं नाही. परंतु, ‘जो खेळाडू आपल्या देशासाठी आवड आणि सन्मानाने खेळतो, त्याच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता,’ असं स्पष्टीकरण त्यानं दिलं आहे. त्यानंतर युसूफ याने पुन्हा आपला जुन्हा रेटा ओढला.
advertisement
शाहिद खान आफ्रिदी कुत्र्यासारखा...
अनादर व्यक्त करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता पण जेव्हा शाहिद खान आफ्रिदी कुत्र्यासारखा भुंकत आहे, असं इरफान पठाण म्हणाला तेव्हा भारतीय मीडिया आणि लोक त्याचं कौतुक का करत होते? सन्मान आणि आदराबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाने ते नाकारायला नको होते का? असा सवाल युसूफ याने सोशल मीडियावर विचारला आहे.
टीम इंडियावर फसवणूक केल्याचा आरोप केला
दरम्यान, एका टीव्ही शो दरम्यान युसुफने सूर्यकुमार यादवला 'सुवरकुमार यादव' असं म्हटलं. त्याने सूर्यकुमारचा 'सुवर' म्हणजेच 'डुक्कर' असा उल्लेख केला. यानंतर, त्यांनी टीम इंडियावर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि म्हटले की, 'टीम इंडिया ज्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं युसूफ लाईट टीव्हीच्या डिबेट शोमध्ये बोलताना दिसतोय.