TRENDING:

Mohammed Shami : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट नाही म्हणाऱ्या आगरकरला शमीने Video शेअर करत दिलं उत्तर! म्हणाला 'मी इथं फक्त...'

Last Updated:

Mohammed Shami Viral Video : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिलेक्शन न झाल्याने संतापलेल्या मोहम्मद शमीने एक व्हिडीओ शेअर करत बीसीसीआयला (Ajit Agarkar) उत्तर दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mohammed Shami Reply To Ajit Agarkar : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वक्तव्यानंतर, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिली होती. मी रणजी टीममध्ये खेळतो म्हणजे मी फिट आहे. मी फिट असल्याची माहिती देणं हे माझं काम नाही, असं म्हणत मोहम्मद शमीने म्हटलं होतं. त्यावर आगरकर यांनी उत्तर दिलं होतं. शमी फिट असता तर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला असता, असं आगरकर म्हणाले होते. त्यामुळे आता दोघांमधील वाकयुद्ध चांगलंच पेटलं आहे.
Mohammed Shami Viral Video Reply To Ajit Agarkar
Mohammed Shami Viral Video Reply To Ajit Agarkar
advertisement

मी इथंच राहण्यासाठी आलोय - मोहम्मद शमी

रणजी ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडविरुद्ध बंगालसाठी शमीने सामना जिंकणारी खेळी खेळली. त्यानंतर, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शमीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, शमी "Im Here to Stay" असे म्हणत असल्याचे दिसत आहे, म्हणजे "मी इथंच राहण्यासाठी आलो आहे, असं म्हणत शमीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

advertisement

मोहम्मद शमीने ओकली आग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

रणजी ट्रॉफी मॅचमध्ये बंगाल आणि उत्तराखंड यांच्यात झालेल्या सामन्यात, अनुभवी मोहम्‍मद शमीने सकाळच्या कंडिशन्सचा पुरेपूर फायदा घेतला आणि भेदक मारा केला. शमीने 25 ओव्हरमध्ये केवळ 38 रन देत 4 महत्त्वाचे विकेट घेतले. त्याला आकाश दीप आणि ईशान पोरेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली. या शानदार बॉलिंगमुळे उत्तराखंडचा संपूर्ण डाव 265 रनवर आटोपला. शमीने 72 रनवर खेळणाऱ्या चंदेलाला एलबीडब्ल्यू (LBW) बाद करून उत्तराखंडच्या पतनाची सुरुवात केली. यानंतर, लंचनंतर मैदानात परतत शमीने अभय नेगी, जन्मेजय जोशी आणि राजन कुमार यांना आपल्या वेगवान बॉलिंगच्या जोरावर आउट केले. 2 विकेटवर 173 रन अशा मजबूत पोझिशनमध्ये असलेल्या उत्तराखंड संघाची स्थिती शमीच्या माऱ्यामुळे अचानक बिघडली. बंगालने उत्तराखंडचे अखेरचे आठ विकेट अवघ्या 92 रनमध्ये घेतले, ज्यामुळे संपूर्ण उत्तराखंडचा संघ 265 रनवर ऑल आउट झाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohammed Shami : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट नाही म्हणाऱ्या आगरकरला शमीने Video शेअर करत दिलं उत्तर! म्हणाला 'मी इथं फक्त...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल