10 नोव्हेंबरला दुबईमध्ये....
या संदर्भात मोहसीन नक्वी यांनी कराचीमध्ये पत्रकारांना माहिती दिली. नक्वी म्हणाले, BCCI सोबत अनेक पत्रव्यवहार झाले. आशिया क्रिकेट कॉन्सिलने त्यांना कळवलं आहे की, 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या समारंभात आम्ही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या खेळाडूंसह बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला यांना ट्रॉफी देण्यासाठी तयार आहोत, असं नक्वी म्हणाले. पण यावेळी त्यांनी आपला हट्ट सोडला नाही.
advertisement
माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा - मोहसीन नक्वी
नक्वी पुढे म्हणाले की, आशिया क्रिकेट कॉन्सिलने BCCI ला लिहिलं आहे की, 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये एक समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. तुमचा कॅप्टन आणि खेळाडूंना घेऊन या आणि माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा, असं म्हणत नक्वीने माज दाखवला आहे. त्यामुळे मोहसीन नक्वी यांना ट्रॉफी द्यायची की नाही? असा सवाल विचारला जात आहे.
स्टेडियममधून ट्रॉफी हटवण्याचे निर्देश
दरम्यान, टीम इंडियाने 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा फायनल सामना जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नव्हती. जवळपास एका तासाच्या वादानंतर नक्वी यांनी स्टेडियममधून ट्रॉफी हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नक्वी यांनी आयसीसीच्या मुख्यालयात ट्रॉफी ठेवली अन् आपल्या आदेशाशिवाय ट्रॉफी द्यायची नाही, असा आदेश देखील दिला आहे.