श्रीलंका-बांगलादेश यांच्यातल्या सामन्यात 20व्या ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. बांगलादेशची स्पिनर नाहिदा अक्तरने ऑफ स्टंपच्या बाहेर स्लायडर टाकला, यावर दिलहारीने उशीरा कट मारला आणि सगळा गोंधळ सुरू झाला.
यानंतर स्टंपिंग पाहण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला आणि सामन्यात ट्विस्ट आला. तेव्हाही बांगलादेशच्या खेळाडूंना दिलहारी आऊट झाली आहे, ते समजलं नाही. बॉल स्टंपवर आदळला, तेव्हा दिलहारीचा पाय हवेत होता आणि बेल्स आधीच पडल्या होत्या, त्यामुळे थर्ड अंपायरने तिला आऊट दिलं. बांगलादेशच्या खेळाडूंना काय घडलं? याचा पत्ताही लागला नाही, तेव्हा थर्ड अंपायरने आऊटचा निर्णय दिला.
advertisement
थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर दिलहारी अंपायरकडे गेली आणि नेमकं काय घडलं? हे समजून घ्यायचा प्रयत्न तिने केला. श्रीलंकेची टीम 270-280 पर्यंत पोहोचेल, असं वाटत होतं, पण त्यांनी शेवटच्या 6 विकेट फक्त 28 रनवर गमावल्या. हसिनी परेराने सर्वाधिक 85 रन केल्या, हा तिच्या करिअरमधील सर्वोत्तम स्कोअर आहे. तर कर्णधार चामारी अटापटूने 46 आणि निलक्षिका सिल्वाने 37 रन केले. बांगलादेशच्या शोर्ना अक्तरने 10 ओव्हरमध्ये 4 मेडन टाकत 27 रन दिल्या आणि 4 विकेट घेतल्या, यामुळे श्रीलंकेचा 202 रनवर ऑलआऊट झाला.