मुंबईकडून 238 धावांचा पाठलाग
हरिणायाने दिलेल्या 238 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने 48 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली. तर सरफराज खानने 25 बॉलमध्ये 64 धावांची महत्त्वाची खेळी केली. जयस्वालने अखेरपर्यंत झुंज दिली. तर अजिंक्य रहाणेला फक्त 21 धावा करता आल्या. सुयांश शेंडगे याने 13 धावा केल्या अन् तो झटपट बाद झाला. तर कॅप्टन शार्दुल ठाकूरला दोन धावा करता आल्या. अखेरीस अथर्व अंकोलेकरने एक फोर अन् एक सिक्स मारत सामना खिशात घातला.
advertisement
त्यापूर्वी, हरियाणाच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा अक्षरशः समाचार घेतला, ज्यामुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये हरियाणाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 234 रन्सचा प्रचंड स्कोर उभा केला. हरियाणाच्या बॅटिंगच्या वादळात मुंबईचे सर्व गोलंदाज भरडले गेले. एकाही गोलंदाजाला 9 रन्स प्रति ओव्हरच्या आत इकॉनॉमी रेट ठेवता आले नाही. तुषार देशपांडे याने 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 52 रन्स दिले. त्याला कोणतीही विकेट्स मिळाली नाही, तर त्याचा इकोनॉमी रेट 13.00 होते. सूर्यांश शेडगे आणि अंकोलेकर यांनीही निराशा केली.
टी-ट्वेंटी संघात जागा मिळवण्याच्या तयारीत
दरम्यान, यशस्वी जयस्वाल याला खूप मेहनतीनंतर आता वनडे संघात जागा मिळवता आलीये. साऊथ अफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या संधीचं त्याने सोनं देखील केलंय. अशातच आता तो टी-ट्वेंटी संघात जागा मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आजची इनिंगने यशस्वीने सिलेक्टर्सला उत्तर दिलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
