IPL 2026 News : आयपीएल 2026चा मिनी लिलाव नुकताच अबुधाबीमध्ये पार पडला आहे.या लिलावात अनेक युवा खेळाडू भाव खाऊन गेली तर काही स्टार खेळाडूंना खूपच कमी भाव मिळाला. अशात आता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची फ्रेंचायजी असलेल्या कोलकत्ता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूला 9.2 कोटीला खरेदी केली होते.इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर या खेळाडूने शाहरुख खानला चुना लावला आहे. कारण या खेळाडूने आयपीएल 2026 हंगामाचे सूरूवातीचे सामने खेळणार नाही, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे शाहरूखला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
खरं तर कोलकत्ता संघाने मिनी लिलावात बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानला ताफ्यात घेतलं होतं.मुस्तफिजूर रहमानला 9 कोटी 20 लाखाच्या किंमतीत कोलकत्ता नाईट रायडर्सने संघात घेतलं आहे. ही डील झाल्यानंतर आता कोलकत्ता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. कारण मुस्तफिजूर रहमानने आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात तो नॅशनल ड्यूटीवर असणार असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे.त्यामुळे तो आयपीएलचा सुरूवातीचा आठवडा नसणार आहे,अशी माहिती आहे.
विशेष म्हणजे मुस्ताफिजूर प्रमाणे अनेक असे खेळाडू आहेत, ज्याची अशीच समस्या आहे,पण त्या खेळाडूंनी लिलावाआधीच त्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली आहे. पण मुस्ताफिजूरने कोणतीही माहिती न देता आता लिलावानंतर आपल्या उपलब्धतेबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे शाहरूख खानला मोठा झटका बसला आहे.
बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात सहभागी होईल, परंतु आठ दिवसांचा कालावधी वगळता तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी परतेल. न्यूझीलंड मालिकेमुळे अनुपस्थिती बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष नझमुल अबेदीन यांच्या मते, रहमान पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होईल.आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सध्या 10 व्या स्थानावर असलेल्या बांगलादेशसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आता त्यांचे लक्ष्य 2027 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता निश्चित करण्याचे आहे.
रहमानच्या पुनरागमनाने त्यांचा संघ मजबूत होईल."आमच्या सध्याच्या ताकदीमुळे, तो संघाला अधिक मजबूत बनवतो.बीसीबीने रहमानला संपूर्ण आयपीएल हंगामासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) दिले होते."तो फक्त तीन सामन्यांच्या न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेदरम्यान राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी परतेल," नझमुल म्हणाला.
