'जर टीम इंडियाला 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बीसीसीआयने गौतम गंभीर आणि अजित आगरकरला लगेच हटवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सन्मानाने रोहित शर्माकडे कॅप्टन्सी सोपवली पाहिजे', असं सिद्धू म्हणाला असल्याची पोस्ट समोर आली होती, त्यावर सिद्धूने स्पष्टीकरण दिलं आहे.
'मी कधीच असं म्हणालो नाही, खोटी बातमी पसरवू नका. मी कधी असा विचारही करू शकत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे', अशी पोस्ट नवजोत सिंग सिद्धूने केली आहे. अजित आगरकर आणि गौतम गंभीरच्या नावाने फिरत असलेली पोस्ट खोटी असल्याचं सिद्धू म्हणाला आहे.
advertisement
गंभीर-आगरकरवर टीका
मागच्या काही काळापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहितची कॅप्टन्सी काढून गिलला कर्णधार करण्याच्या निर्णयानंतर चाहते संतापले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? या प्रश्नावर अजित आगरकरने स्पष्ट उत्तर दिलं नाही. 2027 ला अजून बराच वेळ असल्याचं आगरकर म्हणाला आहे.