कुलदीप यादवला घाबरला पाकिस्तान
पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याची धास्ती घेतली आहे. कुलदीप यादव याने युएईविरुद्ध घेतलेल्या चार विकेट्स पाहिल्यानंतर पाकिस्तान संघाने डोक्याला हात लावलाय. त्यामुळेच पाकिस्तानच्या हेड कोचने पत्रकार परिषदेत स्पिनर्सचा मुद्दा उपस्थित केला अन् भारताला घाबरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
आमच्याकडे मोहम्मद नवाज...
advertisement
आमच्या टीमची वैशिष्ट म्हणजे आमच्याकडे 5 फिरकी गोलंदाज आहेत आणि जेव्हा तुमच्याकडं असे फिरकी गोलंदाज असतात तेव्हा खेळपट्टीमुळे काही फरक पडत नाही. सध्या आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद नवाज आहे. आमच्याकडे अबरार आणि सुफियान देखील आहेत आणि सॅम अयुब सध्या टॉप-10 ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये आहे, असं मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानकडे पाच स्पिनर्स...
दरम्यान, आमच्याकडे सलमान आगा आहे जो एक चांगला कसोटी फिरकी गोलंदाज आहे. जर परिस्थिती अनुकूल असेल तर आमच्याकडे फिरकी गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे 5 जलद गोलंदाज देखील आहेत. आता किती फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल हे खेळपट्टी कशी आहे यावर अवलंबून असेल, असंही मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.