विराटची बॅटिंग प्लस पॉइंट - शुभमन
या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे विराटची जबरदस्त बॅटिंग होय. तो ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, ते पाहून गिलने त्याचं कौतुक केलं. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी नेहमीच प्लस पॉइंट असल्याचं शुभमन गिलने म्हटलं आहे. या अनुभवी खेळाडूच्या बॅटिंगमुळे भारतीय डावाला मोठी मजबूती मिळत असल्याचं गिलने म्हटलं आहे.
advertisement
हर्षित राणाचं कौतुक
युवा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना गिलने हर्षित राणाचा विशेष उल्लेख केला. नंबर 8 वर बॅटिंग करणं सोपं नसतानाही हर्षितने ज्या धैर्याने जबाबदारी स्वीकारली, ते पाहून कर्णधार प्रभावित झाला आहे. हर्षितने केवळ बॅटिंगमध्येच नव्हे, तर या मालिकेत फास्ट बॉलर्सनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्याचेही गिलने कौतुक केलं आहे. तसेच मिडल ऑर्डरमध्ये अजून ताकद हवी होती, असं म्हणत मिडल ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलंय.
नितीश कुमार रेड्डीला संधी मिळावी
भविष्यात होणाऱ्या वर्ल्ड कपचा विचार करून टीम इंडिया व्यवस्थापन नितीश कुमार रेड्डी सारख्या खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छित आहे. नितीशला जास्तीत जास्त ओव्हर टाकण्याची संधी मिळावी, जेणेकरून त्याला स्वतःच्या गोलंदाजीतील विविधता समजेल, असं म्हणत शुभमनने नितीशला वर्ल्ड कपसाठी तयारी करण्याचा मेसेज दिलाय. टीम इंडिया सध्या विविध कॉम्बिनेशनवर काम करत असून वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिसतंय.
टीम इंडिया कमबॅक करेल
दरम्यान, गिलने विश्वास व्यक्त केलाय की, प्रत्येक पराभवातून शिकण्यासारखे खूप काही असतं आणि टीम इंडिया आगामी सामन्यांत अधिक जोमाने पुनरागमन करेल. या मालिकेतील अनुभवाचा फायदा भारतीय युवा खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच होईल.
