एमआय न्यू यॉर्कला नवा कॅप्टन
डावळ्या हाताचा विकेटकीपर फलंदाज जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. कारकिर्दीच्या शिखरावर असलेला पूरन आपल्या कर्णधारपदाने संघाला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास फ्रँचायझीने व्यक्त केला आहे. तिसरा हंगाम गुरुवारपासून सुरू होईल. एमआय न्यू यॉर्कमध्ये क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि रशीद खानसारखे स्टार खेळाडू देखील आहेत.
advertisement
2023 च्या एमएलसी हंगामात पूरनने उत्कृष्ट कामगिरी केली आणि 167 च्या स्ट्राईक रेटने 388 धावा करून तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. अंतिम सामन्यात त्याच्या नाबाद 137 धावांनी एमआय न्यू यॉर्कला पहिल्या विजेतेपदापर्यंत पोहोचवलं होतं. एमआयला विजय मिळवून देण्यात त्याचा सर्वात मोठा वाटा होता.
दरम्यान, 2023 च्या विश्वचषक पात्रता फेरीतून वेस्ट इंडिज बाहेर पडल्यापासून तो एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. तो शेवटचा सामना डिसेंबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध वेस्ट इंडिजकडून खेळला होता. त्यानंतर त्याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता तो एमआय न्यू यॉर्कचं नेतृत्व करताना दिसेल.