सरफराज खान याला जागा नाही
युवा फलंदाज सरफराज खान याच्यासाठी भारत ‘ए’ टीममधील स्थान मिळवणं आव्हानात्मक ठरत आहे. इंग्लंड दौऱ्यात भारत ‘ए’ टीमकडून खेळताना त्याने पहिल्या अनऑफिशियल सामन्यात 92 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र, दुर्दैवाने तो नंतर दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेला. दुखापतीतून सावरल्यानंतर सरफराजने आपल्या तंदुरुस्तीत लक्षणीय सुधारणा केली आणि वजन कमी केले. फिटनेस सुधारून त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कमबॅक करत महत्त्वाच्या 74 रन्सची इनिंग खेळली. असे असतानाही, दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्धच्या आगामी 4-दिवसीय सामन्यांसाठी जाहीर झालेल्या भारत ‘ए’ टीममध्ये सरफराज खान याला जागा मिळाली नाही. या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
कुणाला मिळाली संधी?
दरम्यान, 4 दिवसांच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, सरांश जैन, आयुष बडोनी यांना संधी देण्यात आलीये. तर दुसऱ्या सामन्यात गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप यांना संधी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड देखील दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल.
पहिल्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिककल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी आणि सरांश जैन.
दुसऱ्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.