TRENDING:

RCB vs SRH : विराट कोहली नाही 'या' खेळाडूला रजत पाटीदारने दिलं विजयाचं क्रेडिट! सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट

Last Updated:

RCB captain Rajat Patidar Statement : डफीने ज्या पद्धतीने ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांसारख्या आक्रमक बॅटरना आऊट केलं, तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला, असं पाटीदार म्हणाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या 19 व्या सीझनला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. कॅप्टन ईशान किशन आणि आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. हैदराबादने दिलेलं 202 धावांचं लक्ष आरसीबीने फक्त 16 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं अन् आपण पुन्हा ट्रॉफी जिंकण्यासाठी उतरलोय, याचा शंखनाद केला आहे. या विजयानंतर आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टीमच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. काय म्हणाला रजत? पाहा
RCB captain Rajat Patidar Gives Credit to Jacob Duffy
RCB captain Rajat Patidar Gives Credit to Jacob Duffy
advertisement

... तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला - रजत पाटीदार

आयपीएल सीझनची सुरुवात विजयानं होणं हे टीमसाठी अतिशय पॉझिटिव्ह लक्षण असल्याचं पाटीदारने म्हटलं आहे. विशेषतः टीममधील प्रत्येक प्लेअरने दिलेल्या योगदानामुळे हा विजय सुकर झाला, असं मत पाटीदारने व्यक्त केलं. या मॅचमध्ये डफी याने प्रभावी बॉलिंग करत लक्ष वेधून घेतलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने ज्या पद्धतीने ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांसारख्या आक्रमक बॅटरना आऊट केलं, तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला, असं म्हणत रजतने डफीला विजयाचं क्रेडिट दिलं.

advertisement

Mumbai Indians : बुमराह आला पण मॅचला 18 तास शिल्लक असताना पलटणचे दोन मॅचविनर खेळाडू गायब!

आक्रमक नाही, आम्ही परिस्थितीनुसार खेळतो - रजत पाटीदार

डफीच्या स्पेलमुळे प्रतिस्पर्धी टीमवर दबाव निर्माण झाला आणि आरसीबीला पकड मिळवता आली. डफीच्या या कामगिरीचे कॅप्टनने विशेष कौतुक केलं असून तो टीमसाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असे संकेत दिले आहेत. बॅटिंगमध्ये तर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी टीमला भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे नंतर येणाऱ्या बॅटरना मोकळेपणाने खेळता आले. विकेट बॅटिंगसाठी चांगली होती आणि त्याचा फायदा या दोघांनी उत्तम रितीने घेतला. आक्रमक बॅटिंग हा काही आमचा ठराविक प्लॅन नसून, परिस्थितीनुसार आम्ही खेळत आहे, असं म्हणत पाटीदारने प्लॅन सांगितला.

advertisement

विराट जगातील नंबर वन बॅटर -रजत पाटीदार

त्यावेळी पाटीदार विराट कोहलीचं कौतूक करण्यास विसरला नाही. विराट कोहलीच्या कामगिरीचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. जेव्हा टीम एखादे टार्गेट चेस करत असते, तेव्हा विराट जगातील नंबर वन बॅटर म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडतोय. शेवटपर्यंत क्रिजवर थांबून मॅच जिंकवून देण्याची त्याची कला सर्वांसाठी थक्क करणारी आहे. त्याच्या या जबाबदार खेळीमुळे टीममध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतोय, असंही पाटीदार यावेळी म्हणाला.

advertisement

फिल सॉल्टच्या कॅचचं कौतुक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, यावेळी बोलताना पाटीदार फिल सॉल्टच्या कॅचचं कौतुक करायला विसरला नाही. फिल सॉल्ट कॅच एक टेरिफिक होता. मी देखील थक्क झालो, असंही पाटीदार यावेळी म्हणाला. तसेच आगामी काळात आम्ही याच पद्धतीने विजय मिळवत राहू, असं म्हणत त्याने टीमच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs SRH : विराट कोहली नाही 'या' खेळाडूला रजत पाटीदारने दिलं विजयाचं क्रेडिट! सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल