Virat kohli : 'आम्ही विराटशी बोलू...', RCB चे मालक बदलताच कोहलीचं IPL करिअर धोक्यात? व्हाईस चेअरमनच्या स्टेटमेंटने खळबळ!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
RCB New Vice Chairmen On Virat kohli IPL Career : आरसीबीच्या नव्या रचनेत आर्यमान बिर्ला हे फ्रँचायझीचे चेअरमन असतील, तर टाइम्स ग्रुपचे सत्यन गजवानी व्हाईस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळतील.
RCB New Vice Chairmen On Virat kohli : आयपीएलची डिफेन्डिंग चॅम्पियन टीम असेली रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू टीम आता नव्या मालकांच्या हाती गेली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया, बोल्ट ग्रुप आणि ब्लॅकस्टोन यांनी एकत्रितपणे आरसीबीमध्ये मोठी भागीदारी खरेदी केली आहे अन् आता हा ग्रुप आरसीबीचा मालक असणार आहे. अशातच मालक बदलताच विराट कोहलीच्या आयपीएल करिअरला ब्रेक लागणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
कोहलीच्या आयपीएल करिअरविषयी मोठं वक्तव्य
आरसीबीच्या या नव्या रचनेत आर्यमान बिर्ला हे फ्रँचायझीचे चेअरमन असतील, तर टाइम्स ग्रुपचे सत्यन गजवानी व्हाईस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळतील. अशातच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गजवानी यांनी विराट कोहलीच्या आयपीएल करिअरविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
काय म्हणाले सत्यन गजवानी?
विराट हा एक जगातील उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत पार्टनरशीप करता येत असल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. एकदा का हा करार निश्चित झाला, की पुढील वाटचालीबाबतची, भविष्यबद्दल त्याचं मत समजून घेण्यासाठी आम्ही नक्कीच कोहलीशी चर्चा करू, असं म्हणत गजवानी यांनी आरसीबीच्या फॅन्समध्ये खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहलीचे ध्येये अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणि त्याच्या यशात आम्ही कशा प्रकारे योगदान देऊ शकतो हे निश्चित करण्यासाठी, आम्ही त्याच्याशी आणि त्याच्या संघाशी नक्कीच सविस्तर चर्चा करू, असंही पुढं ते यावेळी म्हणाले.
advertisement
RCB Co-owner Satyan Gajwani said, “no change of RCB, as a brand it has been extremely strong”. (PTI). pic.twitter.com/Slbl6D2qF6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 27, 2026
विराट कोहली फक्त वनडे खेळतो
दरम्यान, विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-ट्वेंटी क्रिकेट खेळत नाही. तो फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब आजमावतोय. वनडे क्रिकेटमध्ये तो आगामी वर्ल्ड कप खेळेल, पण टी-ट्वेंटीमध्ये त्याने ब्रेक घेतला आहे. अशातच आता विराट कोहलीचं आयपीएल करिअर जास्त दिवसाचं नाहीये का? असा सवाल फॅन्स विचारत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:46 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat kohli : 'आम्ही विराटशी बोलू...', RCB चे मालक बदलताच कोहलीचं IPL करिअर धोक्यात? व्हाईस चेअरमनच्या स्टेटमेंटने खळबळ!






