MI vs KKR : बुमराह आला पण मॅचला 18 तास शिल्लक असताना पलटणचे दोन मॅचविनर खेळाडू गायब!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026, Mumbai Indians : बुमराहने फिटनेसवर आणि वर्क लोड मॅनेजमेंटवर काम केलं अन् तो आता पुन्हा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे. पण दोन खेळाडू असे आहेत, ज्यांनी अजून तोंडही दाखवलं नाही.
MI vs KKR IPL 2026 : पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोत्यातून मोठी माहिती समोर आली आहे. पलटणचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. बुमराह शुक्रवारी संध्याकाळी संघाच्या हॉटेलवर पोहोचला. बुमराह रविवारी मुंबईत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे दोन खेळाडू मॅचला 18 तास बाकी असताना देखील अजूनही स्कॉडमध्ये सामील झाले नाहीत. त्यामुळे हार्दिक पंड्याला मोठं टेन्शन आलंय.
मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू गैरहजर
बुमराहने गेल्या पाच दिवस बंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये (CoE) घालवले होते. तिथं त्याने आपल्या फिटनेसवर आणि वर्क लोड मॅनेजमेंटवर काम केलं अन् तो आता पुन्हा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे. पण दोन खेळाडू असे आहेत, ज्यांनी अजून तोंडही दाखवलं नाही. इंग्लंडचा स्टार खेळाडू विल जॅक्स आणि न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर अद्याप आपापल्या संघांमध्ये दाखल झालेले नाहीत.
advertisement
मिचेल सँटनर आणि विल जॅक्सचं कमबॅक कधी?
मिचेल सँटनर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत सहभागी झाला होता, त्यामुळे तो काहीश्या विश्रांतीनंतरच संघात सामील होईल असं मानले जात आहे. या दोन खेळाडूंच्या विलंबामागे कोणतेही अधिकृत कारण उघड करण्यात आलेलं नाही. विल जॅक्स याच्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नाही. तो लवकरच ताफ्यात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. तर मुंबईने तीन बॉलर्सला तयार करून ठेवलंय.
advertisement
The training session where everyone goes all in, for the Sunday opener pic.twitter.com/4gRRi3jF9S
— Mumbai Indians (@mipaltan) March 28, 2026
तीन खेळाडूंची मुंबईत एन्ट्री
आकाश मढवाल, रूशील उगारकर आणि सनी पटेल या तीन खेळाडूंची मुंबईत एन्ट्री झाली आहे. हे खेळाडू मुंबईच्या टीमसोबत थेट सामन्यामध्ये दिसणार नाही आहेत. कारण हे खेळाडू मुंबईचे नेट बॉलर म्हणून संघात सामील झाले आहेत. आकाश मढवाल याचा रोहित शर्मासोबतचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आकाशने रोहितला पाहताच नमस्कार केला.
advertisement
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध
दरम्यान, पहिली मॅच देवाला, अशी मुंबई इंडियन्सची परंपरा आहे. याच पंरपरेचा मान राखत मुंबई इंडियन्सने मागील 13 वर्षात एकदाही सिझनमधील पहिली मॅच जिंकली नाही. अशातच यंदा मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसतंय. अशातच मुंबई आपली परंपरा खंडीत करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs KKR : बुमराह आला पण मॅचला 18 तास शिल्लक असताना पलटणचे दोन मॅचविनर खेळाडू गायब!










