advertisement

Shocking : शिक्षणाचं वय, पण डोक्यात हैवान! सोन्याच्या दागिन्यासाठी चिमुरड्यासोबत केलं भयंकर कृत्य; विक्रोळीतील घटना

Last Updated:

Mumbai News : सोन्याच्या दागिन्यांसाठी चार वर्षाच्या मुलासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

सोन्याच्या दागिन्यांसाठी चार वर्षांच्या मुलाचे अपहरण
सोन्याच्या दागिन्यांसाठी चार वर्षांच्या मुलाचे अपहरण
मुंबई : मुंबईतील विक्रोलीमध्ये घडलेल्या एका घटनेने पालकांची चिंता वाढवलेली आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापाई चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. परिसरात दिवसा-ढवळ्या घडलेल्या या प्रकरणाने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय.
तरुणांच्या डोक्यात भरलंय सोन्याचं खूळ
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपींनी चिमुकल्याला आधीच खाऊचे आमिष दाखवून फूस लावली आणि एका ठिकाणी नेले. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलाच्या कानातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.
अवघ्या 24 तासांत प्रकरणाचा छडा
पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करुन अवघ्या 24 तासांच्या आत दोन्ही या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे मोठा गुन्हा होण्यापासून टळला असल्याचे बोलले जात आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.
advertisement
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद बशीर उर्फ उबेर सलीम शेख(वय25) आणि अरबाज झाहिदअली पठाण उर्फ अल्लू( वय24)अशी आहेत. हे दोघेही विक्रोली पूर्व परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलेली असून यादोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : शिक्षणाचं वय, पण डोक्यात हैवान! सोन्याच्या दागिन्यासाठी चिमुरड्यासोबत केलं भयंकर कृत्य; विक्रोळीतील घटना
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement