advertisement

लग्नानंतर दुसऱ्यासोबत जुळलं, पतीला धोका, पण ‘त्यानं’ डाव साधला, छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: आपल्या संबंधांची माहिती तुझ्या पतीला देईन, असे धमकावत त्याने विवाहितेसोबत भयंकर कृत्य केलं.

लग्नानंतर दुसऱ्यासोबत जुळलं, पतीला धोका अन् पण ‘त्यानं’ डाव साधला, छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं
लग्नानंतर दुसऱ्यासोबत जुळलं, पतीला धोका अन् पण ‘त्यानं’ डाव साधला, छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं
छत्रपती संभाजीनगर : विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत एका युवकाने विवाहित तरुणीला फसवलं. लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गंगापूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (27 मार्च) सायंकाळी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनेद खलील शेख (रा. रेहाना कॉलनी, गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तरुणी ही 20 वर्षीय विवाहित असून, तिची आणि आरोपीची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर अनैतिक संबंधांमध्ये झाले.
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. सुमारे वर्षभर हा प्रकार सुरू राहिला. दरम्यान, तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी आग्रह धरल्याने आरोपी संतापला.
advertisement
या वादातून त्याने तिला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, “आपल्या संबंधांची माहिती तुझ्या पतीला देईन” अशी धमकी देत तिला दडपण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने धैर्याने पुढे येत शुक्रवारी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी जुनेद खलील शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
लग्नानंतर दुसऱ्यासोबत जुळलं, पतीला धोका, पण ‘त्यानं’ डाव साधला, छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement