वसईच्या भोंदूबाबाला पुण्यात येताच मिळालं 'कर्माचं फळ'; हडपसरच्या लॉजमधलं महिलेसोबतचं ते कांड भोवलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली
पुणे: स्वतः महादेवाचा अवतार असल्याचे सांगत एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील हडपसर (मांजरी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा भोंदू बाबा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला पिंपरी परिसरातून ताब्यात घेतले.
नाशिकच्या खरात प्रकरणानंतर या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांची विविध पथके ऋषिकेश वैद्यचा माग काढत होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तो पिंपरी परिसरात असल्याची पक्की माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
advertisement
प्रकरण काय?
वसईचा रहिवासी असलेल्या ऋषिकेशने फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री केली होती. "ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवतो," असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. डिसेंबर २०२३ मध्ये त्याने पुण्यात येऊन महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आधी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, जी नंतर तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.
advertisement
ऋषिकेश वैद्य याच्यावर केवळ या एका महिलेवरच नव्हे, तर इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याला अटक केल्यानंतर आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येईल. या काळात त्याच्याकडून इतर पीडित महिलांची माहिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास केला जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
वसईच्या भोंदूबाबाला पुण्यात येताच मिळालं 'कर्माचं फळ'; हडपसरच्या लॉजमधलं महिलेसोबतचं ते कांड भोवलं









