Tuljapur Darshan: सगळ्यांना सांगा! तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार, ‘या’ दिवसापासून दर्शन सोपं
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Tuljapur Darshan: तुळजापुरात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. यासाठी देखील मंदिर संस्थानकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
धाराशिव: साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणारी तुळजापूरची तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. दरवर्षी ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्री पौर्णिमेचा उत्सव साजरा होतो. येत्या 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून, भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चैत्रोत्सवात तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, तसेच भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी सांगितले.
advertisement
कधी घेता येईल दर्शन?
चैत्र पौर्णिमेनिमित्त मंदिराचे दरवाजे रोज रात्री 1 वाजता उघडले जातील आणि रात्री 11 वाजता बंद होतील. केवळ दोन तासांच्या विश्रांतीनंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले राहणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांना या काळात दर्शन घेता येईल. दर्शन सुलभ व्हावे यासाठी भाविकांना बिडकर पायरीमार्गे दर्शन मंडपात सोडले जाणार आहे.
दरम्यान, तुळजापुरात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. यासाठी देखील मंदिर संस्थानकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. सुवर्णेश्वर गणपती ते महाद्वार चौक आणि संपूर्ण मंदिर परिसरात भव्य मंडप टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्याची सोय देखील करण्यात येत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Tuljapur Darshan: सगळ्यांना सांगा! तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार, ‘या’ दिवसापासून दर्शन सोपं








