मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, उन्हाळी सुट्टीत अजमेर दर्शन सोपं, सोलापुरातून थेट ट्रेन, कधी धावणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Central Railway: उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
सोलापूर: उन्हाळी सुट्टीत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. उत्तर भारतात जाण्यासाठी अनेकजण रेल्वेने पर्याय निवडतात. आता राजस्थान आणि अजमेरला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली असून आता ही गाडी 16 जुलैपर्यंत धावणार आहे.
उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. अजमेर-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीच्या 32 सेवांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही गाडी अतिरिक्त फेऱ्या करणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
अजमेर-सोलापूर ट्रेन क्रमांक 09627 ही गाडी पूर्वी 25 मार्च 2026 पर्यंत दर बुधवारी धावणार होती. तिचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ही गाडी आता 15 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. या गाडीच्या 16 अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.
सोलापूर-अजमेर (ट्रेन क्र. 09628) ही गाडी पूर्वी 26 मार्च 2026 पर्यंत धावणार होती. यामध्ये आता 16 फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून 16 जुलै 2026 पर्यंत अतिरिक्त फेऱ्या होतील.
advertisement
दरम्यान, या ट्रेनमुळे सोलापूरहून राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अजमेर दर्शन सोपे होणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, उन्हाळी सुट्टीत अजमेर दर्शन सोपं, सोलापुरातून थेट ट्रेन, कधी धावणार?








